मुंबई- आयआयटीसाठी महत्त्वाच्या मानण्यात येत असलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएच्या जेईई मेन्स परीक्षेकडे पाहिलं जातं. एनटीएनं 10 एप्रिलला जेईई मेन्स 2025 सेशन 2 ची प्रोव्हिजनल एन्सर की म्हणजे उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली आहे. यावरुन वादंग उठलंय. या उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थी आणि काही तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवत प्रश्न उपस्थित केले आहेत.
भौतिक, रसायन आणि गणित या तिन्ही विषयांच्या प्रश्नांमध्ये एकूण 9 चुका असल्याचा दावा कोचिंग क्लासमधील शिक्षकांनी केला आहे. भौतिकच्या प्रश्नपत्रिकेतील 4, रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत 3 तर गणिताच्या प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्नांची उत्तरं चुकीची असल्याचं त्यांचं म्हणणयं. चुकीची उत्तर बरोबर दाखवण्यात आली आहेत, आणि योग्य उत्तरांचा ऑप्शनमध्ये समावेशच नसल्याचा दावा करण्यात येतोय.

परीक्षेतील 12 प्रश्न याआधीच बाद
जेईई मेन्स 2025 सेशन 2 च्या परीक्षेतील 12 प्रश्न एनटीएनं वाद होण्यापूर्वीच बाद केलेले आहेत. परीक्षा देणाऱ्याया प्र्त्येक विद्यार्थ्याला या 12 प्रश्नांचे प्रत्येकी 4 मार्क आधीच देण्यात येणार आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थाला चुकीच्या प्रश्नांमुळे 48 मार्कांचा फायदा निश्चित आहे. या व्यतिरिक्त 9 प्रश्नांवर आता विद्यार्थी आणि शिक्षक शंका उपस्थित करतायेत. हे प्रश्नही बाद करण्याचा निर्णय झाला तर एकूण 21 प्रश्न या परीक्षेत बाद होण्याची शक्यता आहे.
या परीक्षेत एकूण 90 प्रश्न असतात त्यातील 75 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. या 75 पैकी 21 प्रश्न जर बाद असतील आणि त्याचे प्रत्येकी 4-4 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार अ्सतील, तर परीक्षेची गरजच काय, अ्सा सवाल आता विचारण्यात येतोय. एकूण प्रश्नांचचा विचार केला तर 28 टक्के प्रश्न चुकीचे असल्यानं एक चतुर्थांशापेक्षा जास्त मार्क विद्यार्थ्यांना वाटण्याचा हा प्रकार आहे.
दोन चार वर्ष 18-18 तास अभ्यास करुन विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. पालकही यासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्चून कोचिंग देतात. अशा परिस्थितीत जर प्रश्नच चुकीचे येत असतील, तर ही शिक्षण व्यवस्था काय उपयोगाची असा सवाल संतप्त पालक आणि विद्यार्थी करतायेत. एका एका गुणासाठी स्पर्धा असलेल्या जेईई मेन्समध्ये बाद प्रश्नांसाठी गुण वाटण्यात येत असतील तर हुशार, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी करायचं काय, असा सवाल विचारण्यात येतोय.
शंकांतून एनटीए करणार 261 कोटींची कमाई?
जेईई मेन्सच्या परीक्षेतील 9 प्रश्न विद्यार्थी, शिक्षकांना चुकीचे वाटतायेत. ही शंका विचारण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 200 रुपये या हिशोबानं एकूण 1800 रुपये भरुन शंका निरसन करता येणार आहे.
या परीक्षेला देशभरातून एकूण 12.5 लाख विद्यार्थी बसले होते. या सगळ्यांनी शंका निरसनासाठी अर्ज केले तर यातून एनटीएची 216 कोटींची कमाई होऊ शकते. विद्यार्थ्यांची शंका रास्त असली तरी हे पैसे परत केले जाणार नाहीत.
यापूर्वीच्या परीक्षेत सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी 1 हजार रुपये भरुन नोंदणी केली होती. यातून एनटीएला 130 कोटींची कमाई झाली होती.