मुंबई – तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल… किंवा शहरी भागात राहत अर्पाटमेन्ट राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आता तुमच्या घरावरही सरकारची करडी नजर असणार आहे. आता घरच्या मेंटेन्सेवर जीएसटी कर लागणार आहे. त्यामुळे किती टक्के हा कर लागणार आहे? या कराची प्रक्रिया काय आहे? पाहूया…
किती टक्के जीएसटी ?
दरम्यान, एकीकडे महागाई झपाट्याने वाढत आहे. महागाईचा आगडोंब उसळत आहे. तर दुसरीकडे सामान्य माणसाला विविध कराच्या माध्यमातून जगणे मुश्किल होताना दिसत आहे. तुम्ही जर आता फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी निराजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. फ्लॅटमध्ये अपार्टमेंट किंवा गृहनिर्माण सोसायटीत राहत असाल तर याबाबत कराच्या माध्यमातून सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण संस्थेच्या देखभालीसाठी मेंटेनेससाठी जर तुम्ही महिन्याला 7500 पेक्षा जास्त पैसे मोजत असाल तर आता तुम्हाला त्यावर आता जास्त खर्च करावा लागणार आहे. सोसायटीत राहणाऱ्यांना सरकार देखभाल शुल्क म्हणून आता जास्त पैसे आकारण्याचा विचार करत आहे.

18% जीएसटीची प्रक्रिया काय?
दुसरीकडे तुम्ही तुमची गृहनिर्माण सोसायटी असेल आणि सोसायटीचा देखभालीचा खर्च वीस लाखापेक्षा अधिक असेल तर त्याच्यावर 18% जीएसटी कर लावण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच सोसायटीचा एकूण देखभाल, मेंटेनेससाठी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येत असेल तर, त्यांच्यावर 18% जीएसटीचा नियम लागू होणार आहे. याकरिता तुमच्या फ्लॅटची किंवा घराची स्थिती तपासण्यासाठी स्थानिक व्यावसायिक कर कार्यालयात जाऊन पाचशे रुपये मोजून घर किंवा फ्लॅटची स्थिती तपासू शकता.