Tomato sar recipe in Marathi: टोमॅटो खायला अनेकांना आवडते. त्यामुळे अनेकजण टोमॅटोची भाजीसुद्धा करतात. टोमॅटोपासून विविध पदार्थ बनवता येतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे टोमॅटो सार होय. टोमॅटो सार हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे. अनेकांना भातासोबत, चपातीसोबत खायला टोमॅटो सार हवा असतो. तुम्हालाही टोमॅटो सार घरी बनवायचा असेल तर ही तुमच्यासाठी आहे. चला पाहूया रेसिपी…

टोमॅटो सारसाठी साहित्य-
-४ ताजे टोमॅटो
-४ टेबलस्पून किसलेले नारळ
-२ हिरव्या मिरच्या
-१ टीस्पून जिरे
-१/२ टीस्पून मोहरी
-२ लाल सुक्या मिरच्या
-१/४ टीस्पून हळद पावडर (पर्यायी)
-१/२ टीस्पून लाल मिरची पावडर (पर्यायी)
-चिमूटभर हिंग
-चवीनुसार मीठ
-८-१० कढीपत्ता
-१ टीस्पून तेल
टोमॅटो सारची रेसिपी-
टोमॅटो धुवून, चिरून घ्या आणि उकळत्या पाण्यात शिजवा आणि गाळून घ्या. टोमॅटोचे पाणी बाजूला ठेवा. नंतर ते थंड करा, मिसळा आणि गाळून घ्या.
नारळ, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र करा.
नारळाची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी मिक्स करा. टोमॅटो शिजवलेले पाणी घाला.
आता तेल गरम करा आणि मोहरी घाला, जेव्हा ते तडतडतील तेव्हा सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घाला आणि तयार केलेले मिश्रण घाला. मीठ आणि उर्वरित मसाले घाला
. उकळल्यानंतर, गॅस कमी करा आणि ५-७ मिनिटे उकळवा आणि नंतर गॅस बंद करा.
आता टोमॅटो सार गरम गरम सर्व्ह करा.