मुंबई : तरुण तरुणींसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्की कामाची आहे. आणि ही बातमी नक्की वाचा. ज्यामुळं तुम्हाला लोकसेवा आयोगाच्या मार्फत सरकारी नोकरीच अर्ज करता येईल. दरम्यान, राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना 29 एप्रिल 2025 पासून ते 19 मे 2025 पर्यंत आपला अर्ज दाखल करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आली आहे.
लोकसेवा आयोगामार्फत भरती…
दरम्यान, राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. २९ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळं बेरोजगारांनी या संधीचा फायदा करुन घ्यावा असं सांगण्यात येत आहे.

अर्ज कुठे दाखल करता येणार…
दुसरीकडे सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार पदांचा तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तर आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, असंही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.