मुंबई– गुगल पे, पेटीएम, फोन पे मोबाईलवरचे हे अॅप्स दैनंदिन जगण्याचे घटक झाले आहेत. खिशात पैसे न घेता या अॅप्स्च्या भरोशावर महाराष्ट्रातच नाही तर देशात अगदी दुर्गम भागातही तुम्ही व्यवहार करु शकता. कोरोना काळापासून या अॅपची सवय झालेल्या भारतीयांनी यामुळं रोख पैसे बाळगणं केव्हाच बंद केलंय. अनेकांच्या खिशात महिना महिनाभर रोख पैसेच नसतात, मात्र त्यांना हवं ते, हवं त्या वेळी आणि ठिकाणी ते या अॅप्सच्या माध्यमातून सहज खरेदीही करु शकतात. मात्र या अॅप्सशी विश्वासहर्तता गेल्या 15 दिवसांत तिसऱ्यांदा धोक्यात आलीय. नुकतचं शनिवारी म्हणजेच 12 एप्रिलला अनेक जणं सवयीनुसार या अॅपपैकी एका अॅपवरुन व्यवहार करायला गेले, मात्र त्यांना फटका बसला. पेमेंट फेलचा ऑप्शन आला आणि अनेकांना व्यवहारच पूर्ण करता आले नाहीत. गेल्या 15 दिवसांत यूपीआय अॅप्स वारंवार क्रॅश का होतायेत, पैसे यात अडकले तर काय करायला हवं? असे अनेक प्रश्न आहेत, त्याचीच उत्तरं शोधूयात..
यूपीआय सर्व्हिस वारंवार डाऊन का होतेय?
भारतात डिजिटल पेमेंट सोपं करणारी ही सिस्टिम 2016 साली सुरु झाली. अवघ्या 9 वर्षांत ही सिस्टीम आपल्या जगण्याचा अविभाज्य भागही ठरली. देशात सध्या दररोज 60 कोटी ट्राझक्शन यूपीआयवर होतात त्यातून दररोज 80 हजार कोटींचे व्यवहार होतात. गेल्या 9 वर्षांत या सिस्टिममध्ये फारशा अडचणी आल्या नाहीत, मात्र गेल्या 15 दिवसांत यात अडचणी येताना दिसतायेत. 26 मार्च, 2 एप्रिल आणि 12 एप्रिल या तीन दिवसांत यूपीआय ट्राझक्शन देशभरात बंद पडल्याचं समोर आलं. या परिणाम देशभरातील व्यवहारांवर झाल्याचंही दिसलं

आयपीएलचा परिणाम यूपीआयवर?
1. आयपीएल सुरु असल्यानं गेल्या काही दिवसांत गेमिंग अॅप्सवरील यूपीआय ट्रान्झक्शन चांगलंच वाढलंय. यामुळं सर्व्हरवर लोड आल्यामुळं सर्व्हिस डाऊन झाल्याची शक्यता हे पहिलं कारण आहे.
2. फेब्रुवारी महिन्यात साधारण देशात 52 कोटी ट्रान्झक्शन झाले होते. मार्चमध्ये या संख्येत वाढ होऊन हा आकडा 60 कोटींपर्यंत पोहचलाय. फेब्रुवारीत 1610 कोटींचे तर मार्चमध्ये 1830 कोटींचे ट्रान्झक्शन झाल्याचं सांगण्यात येतंय
3. एनपीसीआयनं 8 एप्रिलला घोषणा केली होती की, आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरण्यात येणारी यूपीआय यंत्रणेचे क्यूआर कोड मर्यादित करण्यात येतायेत. त्यामुळे यूपीआयच्या बॅकएन्डला याबाबत काही काम सुरु असल्याचा परिणामही झाला असण्याची शक्यता आहे.
4. एनपीसीआयच्या सिस्टिमसोबतच यूपीआय बँकांच्या सर्व्हर्सनाही जोडलेले असतात. उदाय एसबीआय, एचडीएफसी अशा बँकांशी. या सर्व्हरमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यास त्याचाही परिणाम या ट्रान्झक्शन्सवर होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही
12 एप्रिलला यूपीआय डाऊन का झालं, याचं स्पष्ट उत्तर अद्याप एनपीसीआयनं दिलेलं नाही. सध्या तांत्रिक दुरुस्ती करत असल्याचं फक्त स्पष्ट करण्यात आलंय.
भविष्यातही यूपीआय डाऊन होऊ शकतं?
यूपीआय येण्यापूर्वी एका बँकेतून दुसऱ्या बँकेचं पेमेंट करण्यासाठी फी आकारणी होत असे. सगळ्या बँकांचे वेगवेगळे अॅप्स होते आणि आहेतही. ही व्यवहार पद्धती सोपी करण्यासाठी एनपीसीआयनं यूपीआय लाँच केलं. आता एनपीसीआयचं एकच नेटवर्क सगळ्या बँकांमध्ये पेमेंटसाठी कार्य करतं. त्यामुळे ट्रान्झक्शन फी हटली. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत व्यवहार करणं सोपंही झालं.
मात्र याचा एक तोटा असाही झाला की एनसपीआयच्या नेटवर्कवरचा लोड वाढला. तुम्ही कोणत्याही बँकेचे ग्राहक असलात आणि यूपीआय वापरावेळी तुम्ही एनपीसीआयचं नेटवर्क वापराल. नेचवर्कमध्ये काही अडचण आली किंवा लोड वाढला तर यूपीआयच्या सर्व्हरचा त्याचा थेट परिणाम होणार. आरबीआय आणि एनपीसीआयच्या वतीनं क्षमता वाढवण्यासाठी आणि समस्या कमी करण्यासाठी नवे फिचर्स आणले जातायेत. त्यात यूपीआय लाईट आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट्सवर काम सुरु आहे.
जोपर्यंत या सुधारणा लागू होत नाहीत तोपर्यंत एनसीपीआयच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतात आणि भविष्यात यूपीआय सर्व्हिसही डाऊन होऊ शकतात.
डिजिटल पेमंट अडकलं तर काय?
सर्व्हर डाऊन असताना तुम्ही पेमेंट केलंत आणि ते अडकलं तर काय, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. जर असं पेमेंट अडकलं तर घाबरण्याची गरज नाही. तुमचं पेमेंच एकतर ज्याला केलंत त्याच्या खात्यात जाईल किंवा तुमच्या खात्यात परत येणार आहे. ट्रान्झक्शन क्लिअर झाल्याचा मेसेजही तुम्हाला येणार आहे. काही मिनिटांत हे पेमेंट क्लिअर व्हायला हवं, फार तर फार 72 तासांच्या अवधीत हे पूर्ण होतंच. कोणाचेही पैसे मध्येच अडकणार नाहीत.
या काळात घाबरुन जाऊ नका, डबल पेमेंट करण्याचं टाळा. जर पेमेंट पेंडिंग दाखवत असेल तर रोख रक्कम देऊन लगेच व्यवहारही टाळा. पेमेंट सक्सेस होतंय का याची वाट पाहा. रोख पैसे दिलेतच तर तुमचे डिटेल्स द्या, म्हणजे पैसे यूपीआयनं आले तर तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळायला हवेत.