कर्जदारांची चिंता मिटली ! RBI कडून पुन्हा रेपो दरात कपात

सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कर्जदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ​​आज बुधवारी (दि.९) पतविषयक धोरण समितीचा निर्णय जाहीर केला. आरबीआयने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. यामुळे आता आरबीआयने रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आरबीआय पतधोरण समितीने रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून तो ६ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. हा दर तात्काळ लागू होईल, असे संजय मल्होत्रा यांनी सांगितले. या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरु झाली होती. त्यानंतर आज रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.

रेपो रेट म्हणजे काय, त्यामुळे कर्जे कशी स्वस्त होतात?

रिझर्व्ह बँक बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो दरात कपात झाल्यामुळे बँकेला कमी व्याजदराने कर्ज मिळेल. बँका स्वस्त कर्ज देतात, म्हणून ते बहुतेकदा हा फायदा त्यांच्या ग्राहकांना देतात. म्हणजेच बँका त्यांचे व्याजदर देखील कमी करतात.

रेपो दरात कपात केल्याने कोणते बदल होतील?

रेपो दर कमी झाल्यानंतर, बँका गृहनिर्माण आणि वाहन यांसारख्या कर्जांवरील व्याजदर देखील कमी करू शकतात. तुमचे सर्व कर्ज स्वस्त होऊ शकतात आणि ईएमआय देखील कमी होईल. जर व्याजदर कमी झाले तर घरांची मागणी वाढेल. अधिक लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतील.

 


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News