पुलाच्या निकृष्ट कामाचा अधिकाऱ्यांसमोरच पंचनामा; बीडमधील ट्रक कोसळल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल

बीडच्या वडवणीत अभियंत्यासमोरच एका ट्रक पलटी झाला. यात अभियंता आणि त्यांच्यासोबत पाहणीसाठी तिथं उपस्थित असलेले गावकरी थोडक्यात बचावले.

बीडच्या वडवणी तालुक्यातील खडकी इथं सध्या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. या कामाच्या पाहणीसाठी गेलेल्या अभियंत्यासमोरच एका ट्रक पलटी झाला. यात अभियंता आणि त्यांच्यासोबत पाहणीसाठी तिथं उपस्थित असलेले गावकरी थोडक्यात बचावले. बीडमधील या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अधिकाऱ्यांसमोरच ट्रक कोसळला!

वडवणी तालुक्यातील खडकी येथे रस्त्याची पाहणी करण्यासाठी काही अधिकारी गेले होते, त्यावेळी हा अपघात झाला. रस्त्याच्या कामाची पाहणी करत असताना, भरधाव ट्रक रस्त्यावरुन घसरून उलटला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे

निकृष्ट दर्जाहीन कामाचा पंचनामा

या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांनी थेट ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’च्या विभागीय कार्यालयात जाऊन तक्रार केली होती. पुलाचं काम सुरू असल्यानं त्या ठिकाणी पर्यायी रस्ता करून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीनंतर संबंधित अभियंत्यांनी “मी स्वतः येऊन पाहणी करतो आणि कंत्राटदाराला योग्य त्या सूचना देतो,” असं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनानुसार आज (9 जुलै) अभियंता पाहणीसाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, याचवेळी अचानक एक ट्रक या रस्त्यावरून जात असताना खाली कोसळला.

ट्रक अचानाक खाली आल्यानं एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी वेळीच पळ काढल्यानं मोठा अनर्थ टळला. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News