…अन् सभागृहात एकच पिकला हशा, विचारांच्या प्रदूषणावर कायदा नाही, मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना खोचक टोला

तुम्ही धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले. पण सकाळचा जो दहा वाजताचा जो भोंगा वाजतो, तो काढण्याची काहीतरी व्यवस्था करा, अशी माझी तक्रार आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील म्हणाले.

Mansoon Sesion – मुंबईला भोंगेमुक्त करण्याचे काम पोलिसांनी केले. मुंबईतील मस्जिदेवरील भोंगे उतरविण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले आहे. एसओपीची अंमलबजावणी निश्चितच होणार आहे. पण आता भोंगेंच काढल्यामुळे प्रत्येक अधिवेशनात अहवाल देण्याची गरज पडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज विधानसभेत धार्मिक स्थळांवरील भोग्यांच्या मुद्दावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

पोलीस अधिकारी जबाबादर राहतील…

जर मुंबईत पुन्हा भोंगे लावण्याचा प्रयत्न केला तर एसओपीमध्ये निश्चितपणे एक बदल करावा लागले. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जो भोंगा लावला जाईल. त्या पोलीस स्टेशनचा त्या भागाचा जो इन्चार्ज असेल त्याच्यावर ही जबाबदारी असेल, त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले. या भोगे उतरविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मी अभिनंदन करतो… त्यांनी सर्वांशी चर्चा करून भोंगे काढलेले आहेत. सर्वांशी विचारविनिमय करुन भोंगे काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंनी आभार मानले.

विचारांच्या प्रदूषणावर कायदा नाही

मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडून चांगलं काम होतं आहे… तुम्ही धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले. पण सकाळचा जो दहा वाजताचा जो भोंगा वाजतो, तो काढण्याची काहीतरी व्यवस्था करा, अशी माझी तक्रार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील म्हणाले. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की, ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आपल्याकडे कायदा आहे. पण विचारांच्या प्रदूषणाविरोधात अजून कायदा नाही. असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खासदार संजय राऊतांना लगावला. यानंतर विधानसभा सभागृहात एकच हशा पिकला.


About Author

Astha Sutar

Other Latest News