जून महिन्यात तब्बल १३ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँकेने पुढील महिन्यासाठी म्हणजेच जून महिन्यासाठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे. जर तुम्हाला जून महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर तुम्ही आतापासूनच त्याचे नियोजन करावे.

Bank Holidays in June 2025:   अवघ्या चार दिवसांनी, नवीन महिना म्हणजेच जून सुरू होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जून २०२५ च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात बँका एकूण १३ दिवस बंद राहतील. यामध्ये बकरी ईद, रविवार आणि दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी येणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांसह अनेक प्रादेशिक सणांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी राज्य सरकारांच्या सहकार्याने सर्व बँकांची सुट्ट्यांची यादी तयार करते आणि ती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक करते. देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँका दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.

याशिवाय, RBI ने काही राज्यस्तरीय सुट्ट्या देखील जाहीर केल्या आहेत ज्या फक्त संबंधित राज्यांमध्येच वैध असतील. म्हणून, ग्राहकांना सल्ला देण्यात येतो की जर त्यांना पुढील महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम करण्यासाठी बँक शाखेत जायचे असेल तर प्रथम सुट्टीची यादी तपासा जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळता येईल.

 

बकरीद ईदचा आठवडा-

केरळमधील कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये ईद-उल-अजहा (बकरीद) निमित्त शुक्रवार, ६ जून रोजी बँका बंद राहतील. त्याच वेळी, देशभरात ७ जून, शनिवार रोजी बकरीदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर, ८ जून, रविवार रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. अशा प्रकारे, केरळमध्ये राहणाऱ्या लोकांना तीन दिवसांचा वीकेंड मिळू शकेल.

 

जूनमध्ये ‘या’ दिवशी बँकांना सुट्टी-

१ जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी – सर्व राज्यांमध्ये बँका बंद

६ जून (शुक्रवार) – ईद-उल-अजहा (केरळमध्ये बँका बंद)

७ जून (शनिवार) – बकरी ईद (ईद-उल-जुहा) – देशभरातील बँका बंद

८ जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

११ जून (बुधवार) – संत गुरु कबीर जयंती / सागा दावा – हिमाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये बँका बंद

१४ जून (शनिवार) – दुसरा शनिवार – देशभरातील बँका बंद

१५ जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

२२ जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

२७ जून (शुक्रवार) – रथयात्रा / कांग – ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद

२८ जून (शनिवार) – चौथा शनिवार – सर्व राज्यांमध्ये बँका बंद

२९ जून (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

३० जून (सोमवार) – रेमना नी – मिझोरममध्ये बँका बंद

 

बँका बंद असल्यास काय करावे?

बँका बंद असल्यास, ग्राहक नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, UPI आणि ATM सेवा वापरू शकतात. खातेधारक या डिजिटल सेवांद्वारे व्यवहार करणे सुरू ठेवू शकतात. केवळ चेक क्लिअरिंग आणि इतर भौतिक व्यवहार, जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत येतात, ते सुट्टीच्या दिवशी शक्य होणार नाहीत.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News