सोशल मिडिया आणि ट्रोलिंग हे जणू काही एक समीकरणच झालं आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकरी स्वत:चं नाव आणि चेहरा लपवून कलाकारांना ट्रोल करत असतात. एखाद्या चांगल्या गोष्टींचं कौतुक तर होतंच; मात्र कौतुकापेक्षा अधिक आता ट्रोलिंग होतं. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगावकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. त्याच्या काही व्हायरल मुलाखतींमुळे त्यांना ट्रोल केले जातेय. या ट्रोलिंगला त्यांनी स्वत: कधी उत्तर दिलं नाही. पण त्यांच्या बाजूने अभिनेते जयवंत वाडकर यांनी त्याची भूमिका व्यक्त केली आहे…
जयवंत वाडकर म्हणाले की…
“सचिन पिळगावकर…. ग्रेट माणूस! मी त्यांना एकदा विचारलं… कारण आपल्याकडे 9 च्या शिफ्टला कुठेच नाश्ता नसतो. पण ते मागवतात. तेव्हा ते मला म्हणालेले, आपण नऊची शिफ्ट लावतो तेव्हा टेक्निशियन किंवा स्पॉट बॉय वगैरे जे असतात ते किती वाजता वगैरे उठून आलेले असतात. त्यांना आल्यावर काहीतरी खायला किंवा नाश्ता मिळाला पाहिजे. कारण नाश्ता मिळाल्यावर एक प्रकारची एनर्जी येते आणि माणूस आनंदाने काम करतो. मग एक तास जरी उशिरा सोडलं तरी ते काहीही बोलत नाही. ‘’

जयवंत वाडकर यांनी सांगितले की, सचिन पिळगावकर सेटवर कसे वागतात, याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, सचिन पिळगावकर स्पॉटबॉयलाही तितकेच आदराने वागवतात, जेवढे ते इतर कलाकारांना वागवतात. त्यामुळेच त्यांच्याकडे इतके यश आहे, असेही ते म्हणाले.
“जे ते खातात तेच इतरांनाही देतात”
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)