बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. दोघांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. या दोघांना चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. अशातच आता लवकरच ही जोडी पुन्हा एकदा एका चित्रपटातून एकत्र झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
‘मस्ती 4’ या चित्रपटात झळकणार
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा ‘मस्ती ४’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘मस्ती ४’ या चित्रपटात जेनेलिया देशमुख विशेष भूमिकेत दिसणार आहे. रितेश आणि जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ (2003) या चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर ‘मस्ती’ (2004), ‘क्या कूल है हम’ (2005) आणि ‘जाने तू… या जाने ना’ (2008) यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये जेनेलिया शूट करताना दिसत आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये रितेश आणि त्याच्या मुलांची देखील झलक दाखविण्यात आली आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग हे लंडनमध्ये सुरू आहे.

पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर शूटिंगदरम्यान तिथे जमलेल्यांपैकी एकानं या चित्रपटाच्या शूटमधील काही व्हिडिओ शेअर केले आहेत.
View this post on Instagram